बनवा तुमचे २०१८-१९ चे आर्थिक कॅलेंडर
बनवा तुमचे २०१८-१९ चे आर्थिक कॅलेंडर- मागील आर्थिक वर्षात तारखा चुकल्यामुळे तुम्हाला भुर्दंड बसला असेल, तर या वर्षी तसे व्हायला नको म्हणून आताच तयारी सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे खाली दिलेल्या... एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते आणि तुम्हाला तुमचे भावी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन संधी मिळते. तसेच या सुमारास आर्थिक घडी नीट करण्याची आणखी कारणे असू शकतात. ती म्हणजे पगारवाढ, वार्षिक बोनस आणि त्याहून महत्वाचे म्हणजे गेल्या वर्षीच्या घडामोडींपासून मिळालेला धडा. जर मागील आर्थिक वर्षात तारखा चुकल्यामुळे तुम्हाला भुर्दंड बसला असेल, तर या वर्षी तसे व्हायला नको म्हणून आताच तयारी सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे खाली दिलेल्या तारखांकडे पाहून स्वतःच्या कॅलेंडरचे योग्य ते नियोजन करुन घ्या. एप्रिल नवीन बजेटमधील योजना १ एप्रिल पासून लागू होतात. त्यामुळे तुम्हाला तुमची कर-बचत योजना नवीन नियमांप्रमाणे करावी लागेल. याचा फायदा तुम्हाला २०१८-१९ च्या आर्थिक वर्षाचा मिळकत कर रिटर्न भरताना होईल. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला जाणार असाल तर आत्तापासून त्याची तयारी सुरू करून सूट (डिस्काउंट) आणि...